कुठल्याही अमिषाला बळी पडू नका, आपल्या बहिणीला साथ द्या; मतदानाच्या एक दिवसआधी शुभांगी पाटील यांचं आवाहन

| Updated on: Jan 29, 2023 | 11:54 AM

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना आवाहन केलंय. पाहा काय म्हणाल्या आहेत...

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना आवाहन केलंय. “पाचही जिल्ह्यातून पदवीधर भाऊ आणि बहिणींचा पाठिंबा मिळत आहे. जनशक्ती पेटलेली आहे. तिचा अंत होऊ देऊ नका. जनता जनार्दन असते. या जनतेने कुणाच्या अमिषाला, खोट्यानाट्या आश्वासनाला बळी पडू नये, योग्य उमेदवार निवडावा”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत. विजयी झाल्यावर अनेक प्रश्नांवर आंदोलन करेन, असा शब्दही शुभांगी यांनी मतदारांना दिलाय.

दुनिया है मेरे पीछे, लेकिन मैं तेरे पीछे; जेव्हा सुप्रिया सुळे गाणं गातात…
शिंदे-फडणवीस सरकार असंवेदनशील म्हणून लोक आंदोलनं करताहेत- सुप्रिया सुळे