आज राज्यभरात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

| Updated on: Apr 09, 2022 | 10:10 AM

शरद पवार यांच्या घराबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार असून,  आज राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांकडून शुक्रवारी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. दरम्यान आता या आंदोलनाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार असून, आज राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

पोलिसांची एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, आझाद मैदानातून बाहेर काढले
विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार, वाहनचालकाचा पेट्रोल पंपावर राडा