‘या’ शहरात बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुकारला संप, अडीच महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने काम बंद करत पुकारला संप
याच्याआधी तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी ते आंदोलन केले होते. त्यावेळी पगार देण्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
नाशिक, 18 जुलै 2023 | नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. सिटीलींक बसच्या चालकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. सतत पगार होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याच्याआधी तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी ते आंदोलन केले होते. त्यावेळी पगार देण्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. मात्र फक्त ३ महिन्यातच पुन्हा एकदा सिटीलींक बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ड्रायव्हर कंडक्टर तसेच सिटीलिंकच्या इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे आज सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांनी काम बंद करत संप पुकारला. दरम्यान या संपामुळे सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडलेल्या चाकरमाने आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे
Published on: Jul 18, 2023 09:56 AM