आंगणेवाडीतील भराडी देवीचा यात्रोत्सवाला सुरुवात, भाविकांची पहाटेपासून रांगा

| Updated on: Feb 24, 2022 | 12:22 PM

लाखो भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या (Bharadi devi) जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे.

लाखो भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या (Bharadi devi) जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली. पहाटे सव्वातीन वाजल्यापासून वाजता देवीच दर्शन सुरू झाल. मागील वर्षी कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे ही जत्रा केवळ आंगणे कुटुंबीयांपूरती मर्यादित स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर आंगणेवाडीची जत्रा भाविकांच्या गर्दीत संपन्न होत आहे. यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत. कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली आहे. सकाळपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसंच भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, प्रसाद लाड, अतुल काळसेकर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, आमदार वैभव नाईक अशा अनेक मान्यवरांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं.

Published on: Feb 24, 2022 12:22 PM
मलिकांवर सूडबुद्धीने कारवाई – आव्हाड
अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई