उद्धवला आण, बघतो तो कसा येतो ते; एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Apr 30, 2023 | 12:45 PM

Narayan Rane on Uddhav Thackeray : नारायण राणेंकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख; बारसूतील आंदोलनावरही भाष्य; पाहा व्हीडिओ...

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धवला आण, बघतो तो कसा येतो ते… कोकणच्या विकासाच्या आड जो कोणी येईल. त्याला मी विरोध करणारच. उद्या उद्धव ठाकरे जरी बारसूला आला आणि त्याने या प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला. तरी मी त्याला विरोध करेन. या प्रकल्पाच्या मी समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे. तेही रत्नागिरीतच! एकदाच काय ते होऊन जाऊदे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत. एक वेळ कोकणचा कॅलिफोर्निया करू असं म्हणत होते. त्या कॅलिफोर्नियात असे 14 प्रकल्प आहेत. आर्थिक प्रगती हवी असेल तर प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. कोणीही या पुढे कोकणातल्या प्रकल्पाला विरोध करेल त्याला मी सामोरे जाणार आहे, असंही राणे म्हणालेत. संजय राऊतला काय माहित आहे. जैतापूर प्रकल्पाचा मुद्द मी विधानसभेत लावून धरला होता. संजय राऊतला दुसरं काही काम नाही, असंही ते म्हणालेत.

Published on: Apr 30, 2023 12:44 PM
मुंबईत शाह का आले असतील?; राऊत यांनी दिले ‘हे’ उत्तर
शिवसेना अन् शरद पवार यांच्यात नेमकी कोणती कमिटमेंट? संजय राऊत यांनी थेट सांगितलं….