नितेश राणे आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत, पक्ष बदलला की भूमिका बदलली!; कुणाचा घणाघात?
Vaibhav Vaik on Nitesh Rane : नितेश राणे हे भाजपचे स्वयंघोषित प्रवक्ते; ठाकरे गटाच्या नेत्याचा जोरदार निशाणा, पाहा व्हीडिओ...
सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे आपल्या भूमिकेवर ठाम नसतात.वे गवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या भूमिका घेतात. पक्ष बदलला की भूमिका बदलली!, असा टोला वैभव नाईक म्हणाले आहेत. नितेश राणेंनी स्वतः ची स्वतः नेमणूक करून घेतली आहे. भाजपने त्यांना सांगितलेलं नाही. यांना कोणी जबाबदारी देणार नाही. ते स्वयंघोषित प्रवक्ते आहेत, असंही ते म्हणाले आहेत. संजय राऊत हे शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची भूमिका मांडत असतात.त्यांच्या भूमिकांवर बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही. उदय सामंतांना उद्धव ठाकरेंमुळेच मंत्रीपद आणि म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं होतं. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असं नितेश राणे म्हणालेत.
Published on: Apr 28, 2023 02:02 PM