VIDEO : महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कारनामे अंगलट, आंदोलनानंतर नतमस्तक होण्याची वेळ

VIDEO : महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कारनामे अंगलट, आंदोलनानंतर नतमस्तक होण्याची वेळ

| Updated on: Mar 16, 2021 | 1:08 PM

महावितरण कार्यालयातील कारभाराविरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. (Sindhudurg Mahavitaran officer apologizes)

सिंधुदुर्ग : वैभववाडी महावितरण कार्यालयातील कारभाराविरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेत ठिय्या आंदोलन केले आहे. सहाय्यक अभियंता थोरबोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याविरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेत ठिय्या आंदोलन केले आहे. यानंतर या अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्यांसमोर जमिनीवर नतमस्तक होत माफी मागितली. (Sindhudurg Mahavitaran officer apologizes to bjp activist)

तर त्याच वैभववाडी वीज वितरण कार्यालयात गौस मुल्ला या सहाय्यक अभियंत्याने निराधार वृद्धेकडून महावितरण खांब बदलण्यासाठी 8 हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. यावेळी मुल्ला यांच्याकडून घेतलेले आठ हजार रुपये आणि दंड म्हणून घेतलेले आठ हजार असे एकूण 16 हजार रुपये त्या निराधार महिलेला परत करण्यात आले.

यामुळे वैभववाडीतील महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर आले आहेत. सध्या या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. हा अधिकारी माफी मागतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाची वैभववाडीत जोरदार चर्चा सुरु आहे. (Sindhudurg Mahavitaran officer apologizes to bjp activist)

Nitesh Rane | वरूण सरदेसाईंचं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : नितेश राणे
Special Report : न्यायाधिशांकडून टोलमध्ये सूट मिळवण्याचा प्रयत्न, टोल मॅनेजरनेच शिकवला कायदा