अमृता फडणवीस यांची उर्फी प्रकरणावर प्रतिक्रिया; मिसेस फडणवीस काय म्हणाल्या?
उर्फी जावेद आणि त्रा वाघ यांच्यातील वाद उफाळून येत असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : अतरंगी अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच रंगला आहे. कधी उर्फी ट्वीट करते तर त्यावर पलटवार करण्यासाठी चित्रा वाघ पत्रकार परिषद घेतात. त्यानंतर पुन्हा ट्वीट युद्ध सोशल मीडियात पहायला मिळत. आता या वादावर मिसेस फडणवीस यांनी देखिल प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केल. त्यावर उर्फीने ‘डीपी मेरा धासू, चित्रा मेरी सासू’ म्हणत त्यांना जोरदार टोला लगावला. यावरून वाद उफाळून येत असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी उर्फी प्रकरणी त्यांचे मत मांडताना, उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला वावगं काहीही वाटत नाही, असे म्हटलं आहे. तसेच काहींची व्यावसायिक गरज असते. त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसे फिरत असाल, तर ते ठिक नाहीये असे म्हटलं आहे.
याबरोबर त्यांनी उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे असेही म्हटलं आहे.