सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
अभिनेता सोनू सूद याच्या मदतीचे अनेक किस्से जगजाहीर आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्याने शेकडो लोकांना मदत केली, त्याच्या मदतीचा हा वसा अद्यापही कायम आहे.
अभिनेता सोनू सूद याच्या मदतीचे अनेक किस्से जगजाहीर आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्याने शेकडो लोकांना मदत केली, त्याच्या मदतीचा हा वसा अद्यापही कायम असून आता त्याच्या मदतीमुळे एका मुलीला नवी दृष्टि मिळाल्याचे समोर आले आहे. सोनू सूद पुन्हा एकदा गरजवंताच्या मदतीसाठी पुढे झाल्याचे उत्तम उदाहरण समोर आलं.
कोपरवागातील गायत्री थोरात हिने लहानपणी तिची दृष्टि गमावली होती. मात्र सोनी सूदने पुढाकार घेऊन मदतीसाठी हात पुढे केल्याने गायत्रीच्या जीवनातील अंधार दूर झाला असून तिच्या जीवनात पुन्हा प्रकाश आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणाऱ्या गायत्री थोरात ही अडीच वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेला आणि तिचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला. तर उजव्या डोळ्याने थोडंफार दिसायचं. तिची ही परिस्थिती सोनू सूद याला समजली आणि त्याने पुढाकार घेत तिची मदत केली. कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्या पुढाकाराने आणि अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळे महागडी शस्त्रक्रिया करून गायत्री हिला गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली. सोनू सूद याच्या मदतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे .