…तर राज्य सरकार कोसळू शकते, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Sep 07, 2022 | 7:18 PM

16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. असं झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केली.

राज्यातील घटनात्मक पेचाबाबत घटनापीठ तयार झालंय. आज या घटनापीठासमोर सुनावणी झाली. आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला घटनापीठासमोर होणार आहे. अशावेळी घटनापीठं काय निर्णय देते, हे देशातील 28 राज्यांना लागू होणार आहे. त्यामुळं हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, राज्यापालांचे अधिकार काय, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लानुसार वागणं आवश्यक आहे का,पक्षांतर बंदी कायद्याचा नेमका अर्थ काय,खरा पक्ष कुठला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.हे सर्व विषय घटनापीठाकडून घ्यायला पाहिजे. आता 141 कलमाखाली जो निर्णय लागेल तो हायकोर्टाला बंधनकारक राहील. भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय होतोय.चंद्रचूड हे घटनापीठाचे मुख्य न्यायाधीश आहेत. हे कायदा क्षेत्रातील मोठे अधिकारी आहेत. तीन आठवडे न्यायाधीश अभ्यास करतील.त्यानंतर काय तो निर्णय होईल. 16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. असं झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केली.

Nitish Kumar : पंतप्रधान पदावरून पुन्हा नितीश कुमारांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ऐका….
Special Report | तुर्त ‘धनुष्यबाण’ना ठाकरे, ना शिंदेंना?