सरकारचा एकमेव हेतू राज्यात दंगली; संजय राऊत यांचा निशाना

| Updated on: Mar 30, 2023 | 12:30 PM

राऊत यांनी, या सरकारमधील काही लोकांचा हेतूच हा आहे की राज्यात दंगली व्हाव्यात. राज्यात अस्थिरता आणि अशांतता निर्माण व्हावी. दंगे व्हावेत, हिंसा व्हावी. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिर परिसरात जोरदार राडा झाला. दोन तरूणांच्या गटात झालेल्या भांडणाचे रूपांतरण राड्यात झाले आणि पोलिसांच्या गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या राड्याला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका केली. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

राऊत यांनी, या सरकारमधील काही लोकांचा हेतूच हा आहे की राज्यात दंगली व्हाव्यात. राज्यात अस्थिरता आणि अशांतता निर्माण व्हावी. दंगे व्हावेत, हिंसा व्हावी. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. जनता बोलतेच की हे सरकार झोपलेलं आहे आता न्यायालयही बोललं. यामागे आम्ही नाहीत. या सरकारची पत काय? प्रतिष्ठा काय? हे दिसून येतं. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आलं आणि काम करतं हे कोर्टाच्या वाक्यातून स्पष्ट झालं आहे. कोर्टाने कधीच कोणत्याही राज्याविषयी नपुंसक हा शब्द वापरला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 12:30 PM
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय ब्रिज प्रवाशांसाठी खुला; पाहा व्हीडिओ…
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीनंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना ‘तो’ एक प्रश्न विचारला