नपुंसक, हे आम्ही म्हणत नाही. कोर्ट म्हणतय, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Mar 30, 2023 | 12:16 PM

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाना साधला आहे

मुंबई : देशातील सामाजिक असंतोष आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. त्यावरून आता राज्यात राजकारण चांगलेच तापलेलं आहे. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहे. विरोधकांकडून सरकारवर परखड टीका केली जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. तसेच टीका देखील केली आहे.

राऊत यांनी, शिंदे-फडणवीस सरकार हे नपुंसक आहे. हे आम्ही म्हणत नाही. यामागे आम्ही नाही. न्यायालय म्हणतय. यापूर्वी जनता म्हणत होती. त्यामुळे आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर येईल अशी आशा असल्याचं ते म्हणाले.

Published on: Mar 30, 2023 12:16 PM
बावणकुळे यांच्या इंदापुरमध्ये झालेल्या सभेवर राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका, ‘तो’ कार्यक्रम गुंडांच्या टोळीचा
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय ब्रिज प्रवाशांसाठी खुला; पाहा व्हीडिओ…