अजितदादा म्हणजे देवमाणूस, त्यांना एकदा भेटायचंय- गौतमी पाटील

| Updated on: Feb 13, 2023 | 10:04 AM

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी संदीप शिंदे यांनी...

सोलापूर : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटायची इच्छा व्यक्त केली आहे.अजित पवार देवमाणूस आहेत.माझं म्हणणं त्यांच्यासमोर मांडण्यासाठी अजितदादांना एकदा भेटायचं आहे. लगेच तर त्यांना भेटता येणार नाही. पण येत्या काही दिवसात मी त्यांना भेटणार आहे. मला राजकारणातलं फारसं काही कळत नाही. मला राजकारणात पडायचं पण नाही, असं गौतमी म्हणाली. गौतमी पाटील यापुढे फक्त लावणीच सादर करणार नाही. तर वेस्टर्न डान्स आणि अॅक्टिंगही करेल, असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

Published on: Feb 13, 2023 10:03 AM
बरगड्या तुटल्या, श्वास घेता येईना, हलताही येत नव्हतं; अपघातानंतर पहिल्यांदाच बोलताना धनंजय मुंडे भावूक
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कुठे बोलतात आणि कुठे नाही याचे कारण