दिव्यांग मुलीचा जीव अधिकाऱ्यांमुळे गेला

| Updated on: Aug 28, 2022 | 11:12 AM

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिकर्डे या गावात दिव्यांग मुलगी वैष्णवी कुरुळे या ग्रामपंचायतीतील निधीसाठी उपोषणास बसली होती. मात्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणास बसली असतानाच तिचे निधन झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिकर्डे या गावात दिव्यांग मुलगी वैष्णवी कुरुळे या ग्रामपंचायतीतील निधीसाठी उपोषणास बसली होती. मात्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणास बसली असतानाच तिचे निधन झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापणार आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांनी केला आहे. या घटनेची दखल सरकारने घेतली असती तर या दिव्यांग मुलीचा जीव वाचला असता अशी भावनाही तिच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे. मुलीचा जीव गेल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आठवले खरात गटांनी केली आहे.

Girni Kamgar | गिरीणी कामगारांच्या घरासाठी लवकरच म्हाडाची सोडत – tv9
Amit Shah यांचा 5 सप्टेंबरला मुंबई दौरा-tv9