बस सुरु झाली, विद्यार्थिनीच्या हस्ते एसटी बसचं पूजन

| Updated on: Sep 13, 2022 | 9:45 AM

बस सुरु झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून या गावामध्ये बसची सुविधा करण्यात आली नव्हती. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. 

सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या दारफळमध्ये बस सुरु झाली आहे. गावामध्ये ही बस पहिल्यांदाच सुरु झाल्याने गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे होणारी नगारिकांची आणि शाळेसाठी होणारी पायपीठ थांबणार आहे. ही बस पहिल्यांदाच बस सुरु झाल्याबद्दल विद्यार्थिनीच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. बसचे उद्घाटन झाल्यानंतर ही बस मार्गस्थ करण्यात आली. या बसमुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी पायपीठ आणि होणार शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. बस सुरु झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून या गावामध्ये बसची सुविधा करण्यात आली नव्हती. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते.

Published on: Sep 13, 2022 09:45 AM
Video: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्याला देणार दोन लाखांचे बक्षीस
Video: शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी अर्जाची छाननी सुरु