VIDEO : भाजप नगरसेवकाने माईक फेकला, बोलू न दिल्याने आक्रमक पवित्रा
सोलापूर महानगर पालिकेच्या सभेत मोठा गोंधळ झाला. सभेत बोलू न दिलाच्या कारणारून भाजपच्या नगरसेवकाने माईक फेकून दिले. याप्रकरणी महापौर श्रीकांचना यनम यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांना सभेतून निलंबित केले.
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal corporation) सभेत मोठा गोंधळ झाला. सभेत बोलू न दिलाच्या कारणारून भाजपच्या नगरसेवकाने माईक फेकून दिले. याप्रकरणी महापौर श्रीकांचना यनम यांनी नगरसेवक सुरेश पाटील (Suresh Patil) यांना सभेतून निलंबित केले.
भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांचा भाजपला घरचा आहेर. सुरेश पाटील यांच्या प्रभागातील नाल्यावर असलेल्या बेकायदेशीर घरांच्या पाडकामावर प्रश्नावरून पालिकेत राडा झाला. सुरेश पाटील यांच्या पत्रावरून बेकायदेशीर घरे हटविले जात असल्याचे काँग्रेस, एमआयएम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आरोप केला होता. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी नगरसेवक सुरेश पाटील बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुरेश पाटील यांना महापौर श्रीकांचना यनम यांनी बोलू न दिल्याचा आरोप आहे. या प्रकारातून नगरसेवक सुरेश पाटील यांनी माईक फेकून दिले. (Solapur Municipal Corporation rada in genaral meeting BJP corporator Suresh Patil throw mike )