आधी पावसात भिजले नंतर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं…

| Updated on: Jul 06, 2024 | 4:19 PM

भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरात एका महिलांच्या मेळाव्यात भर पावसात भाषण केले. यावेळी महिला भरपावसात जागेवरच बसून राहिल्याने चंद्रकांत पाटीलही पावसात भिजले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी शरद पवार यांना अशी कोपरखळी मारली.

सोलापूर येथील रामवाडी परिसरात ब्रिटीशकाळापासून जमिनीच्या हक्कासाठी लढणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या बांधवांना आज त्यांच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले त्याचे वितरण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका सोहळ्यात झाले.यावेळी महिलांची प्रचंड गर्दी होती. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भर पावसात भाषण केले. त्यांनी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. ते म्हणाले की आमच्या सरकारने अर्थसंकल्पात चार मोठ्या घोषणा दिल्या होत्या. दोन घोषणा आधी केल्या होत्या. दरमहा महिलांच्या अकाऊंटवर पंधराशे रुपये त्यांच्या घर खर्चासाठी आणि मुलांच्या संगोपणासाठी मिळणार आहेत, दरवर्षाला तीन गॅस सिलींडर फ्रि मिळणार, महिलांना ‘पिंक ऑटो रिक्षा’ मिळणार, मुलींचे शिक्षण आता मेडीकल आणि इंजिनिअरिंगपर्यंत मोफत होणार, ‘लेक लाडकी’ योजनेत मुलींना जन्मल्यापासून 18 वर्षांची होईपर्यंत एक लाख रुपये मिळणार, महिला बचत गटांना कमी व्याज दराचे कर्ज, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यापासून आशाताईंना मानधन वाढविणे या सर्वांचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोणतीही निवडणूक नसताना मी पावसात भिजल्याची कोपरखळी चंद्रकांत पाटील  शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना लगावली. सातारा पोट निवडूकीत श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करताना शरद पवार पावसात भिजल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ही निवडणूक श्रीनिवास पाटील यांनी जिंकली होती.

Published on: Jul 06, 2024 04:11 PM
‘वेळ कशी कोणावर येते…,’ क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
‘नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प…,’ काय म्हणाले नितीन गडकरी