अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेतीचं नुकसान; दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट

| Updated on: Apr 10, 2023 | 10:46 AM

वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. पाहा व्हीडिओ...

सोलापूर : वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नांदणीतील दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. नांदणीच्या शहाजी मासाळ या शेतकऱ्याची 2 एकर बाग मातीमोल झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मासाळ द्राक्षांची काढणी करणार होते. त्याआधी पावसामुळे नुकसान झालं आहे. साधारण 40 ते 50 टन द्राक्ष उध्वस्त झाल्याने जवळपास 15 ते 16 लाखांचं नुकसान झालं आहे. बार्शी तालुक्यातील नांदणी, उपळे, मळेगाव परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसला आहे. सततच्या येणाऱ्या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी, शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Published on: Apr 10, 2023 10:22 AM
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार; मंत्री दीपक केसरकर यांचा शब्द
जळगावमध्ये अवकाळी पाऊस, शेतीचं नुकसान; उभी पिकं जमीनदोस्त