स्वर्गीय बाळासाहेबांच्या गुणाचे मूल्यमापन करण्याची काही लोकांची नैतिकताच नाही- नारायण राणे
अन कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस या दोन शब्दावर त्यांनी राजकारण केलं. अन शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केलं. साहेबांनी कमावलं त्यांच्या गुणाचे मूल्यमापन करण्याची काही लोकांची नैतिकताच नाही. एक टक्का नाही.
मुंबई – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या गुणांच मूल्यमापन कुणीच करू नये. त्यांना कुणी भोळे म्हणू नये. एवढी वर्षे शिवसेना(shivasena) चालवून त्यांनी प्रगतीकडे नेली.राज्यही त्यांनी मिळवले, ते काही भोळे म्हणून नाही. कर्तृत्वानं होते. त्यांना माणुसकी होती. अन कडवट हिंदुत्व (Hindu) आणि मराठी माणूस या
दोन शब्दावर त्यांनी राजकारण केलं. अन शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केलं. साहेबांनी कमावलं त्यांच्या गुणाचे मूल्यमापन करण्याची काही लोकांची नैतिकताच नाही. एक टक्का नाही. आज महाराष्ट्रच्या वर्धापन दिनी (Maharashtra Day)महाराष्ट्राच्या लोकांना काहीतरी देण्यासारखे बोलावे. मुख्यमंत्र्याना सांगा ते स्वतःचाच भोंगा वाजवत आहे. असे म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.