अजित पवारांनी राष्ट्रवादीचा चेंडू थेट मंत्रीमंडळ विस्तारात नेला; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होणार?
गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याच पहाटेच्या शपथ विधीवरून राजकीय वाकयुद्ध रंगलेलं होतं. गुगलीवरून रंगलेलं हे नाट्य आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे.
मुंबई : 2019 च्या शपथविधी नंतर त्यावरून अनेक चर्चा सतत समोर येत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याच पहाटेच्या शपथ विधीवरून राजकीय वाकयुद्ध रंगलेलं होतं. गुगलीवरून रंगलेलं हे नाट्य आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. यावेळी मात्र विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा चेंडू गुगली न टाकता तो सरळ ग्राऊंडच्या बाहेर मारला आहे. त्यांनी आपल्या 30 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान आज अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. यानंतर अजित पवार हे थेट राजभवनात दाखल झालेत. तर ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. याचबरोबर राष्ट्रवादीचे 9 आमदार हे देखील यावेळी मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.