Special Report | Raj Thackeray यांच्या विरोधासाठी अयोध्येत मोठी बैठक!-TV9
भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखण्याची पूर्ण तयारी केलीय. 5 जूनला अयोध्येत राज ठाकरेंना येऊच देणार नाही, असा इशारा ब्रृजभूषण यांनी दिलाय. विशेष म्हणजे अयोध्येत ब्रृजभूषण यांनी संतांसह 50 हजार उत्तर भारतीयांची बैठक बोलावलीय.
भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना रोखण्याची पूर्ण तयारी केलीय. 5 जूनला अयोध्येत राज ठाकरेंना येऊच देणार नाही, असा इशारा ब्रृजभूषण यांनी दिलाय. विशेष म्हणजे अयोध्येत ब्रृजभूषण यांनी संतांसह 50 हजार उत्तर भारतीयांची बैठक बोलावलीय. याच बैठकीत राज ठाकरेंना रोखण्याची रणनीती आखली जाणार आहे. उत्तर भारतीयांचा मनसेनं ज्याप्रकारे अपमान केला..त्यांना मारहाण केली..त्यावरुन माफी मागा, असं आवाहन ब्रृजभूषण यांनी केलं होतं. मात्र आता माफीचीही वेळ निघून गेल्याचं ब्रृजभूषण यांनी म्हटलंय. मनसेकडून राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु झालीय. महाराष्ट्रातून अयोध्येत येण्यासाठी ट्रेन बूक झाल्यात..मात्र आता भाजपच्याच खासदारानं राज ठाकरेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध केलाय..त्यातच आपण महाराष्ट्रातून मनसेच्या नेत्यांचे येणारे फोन कॉल्सही घेत नसल्याचं ब्रृजभूषण म्हणतायत..