Special Report | ये अजित दादा का स्टाईल है…! सरकारला धरलं धारेवर
त्यावरुनही अजित पवारांनी दादांना विधानसभेत उत्तर देणार असा सूचक इशारा दिलाय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली..त्यामुळं आता महाविकास आघाडीचं काय होणार ?, हा प्रश्न आहे...मात्र पुढं काय करायचं हे तिन्ही पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असं अजित दादा म्हणालेत.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी, शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतलाय. दोघांचंच सरकार असून, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही ?, असा सवाल अजित पवारांनी केलाय. आधी अजित दादांनी अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमिवर तात्काळ अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. सरकार स्थापन करताच शिंदे-फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला झटका दिला. अजित पवारांनी घोषित केलेला निधी मुख्यमंत्र्यांनी रोखला, त्यावरुनही अजित पवार चांगलेच संतापले. पत्रकार परिषदेत अजित पवार चांगलेच तुटून पडले…एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी मनावर दगड ठेवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते..त्यावरुनही अजित पवारांनी दादांना विधानसभेत उत्तर देणार असा सूचक इशारा दिलाय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली..त्यामुळं आता महाविकास आघाडीचं काय होणार ?, हा प्रश्न आहे…मात्र पुढं काय करायचं हे तिन्ही पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असं अजित दादा म्हणालेत.