Special Report | अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेना आणि मनसे आमनेसामने, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
आदित्य ठाकरे हे 15 जून रोजी अयोध्येत जात रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे आढावा घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर गेले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं शिवसेनेची कोंडी झाल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार असल्यानं त्यांचा 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला. त्यातच आदित्य ठाकरे हे 15 जून रोजी अयोध्येत जात रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे आढावा घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर गेले.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला असला तर काही मनसे कार्यकर्ते 5 जून रोजीच अयोध्येला दाखल झाले आणि त्यांनी श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेतलं. या घडामोडींसोबत अयोध्येत मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा एकदा टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.