Special Report | पोलिसांच्या घरांसाठी भाजप मैदानात!-TV9
बीडीडी चाळीत पोलीस कर्मचाऱ्यांना 50 लाखात घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर वादंग निर्माण झालाय. घर घेण्यासाठी 50 लाख आणयचे कुठून अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर आता भाजपनं देखील त्यांच्या समर्थनार्थ उपोषणाचं हत्यार उपसलंय.
बीडीडी चाळीत पोलीस कर्मचाऱ्यांना 50 लाखात घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर वादंग निर्माण झालाय. घर घेण्यासाठी 50 लाख आणयचे कुठून अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर आता भाजपनं देखील त्यांच्या समर्थनार्थ उपोषणाचं हत्यार उपसलंय…. भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांनी बीडीडी चाळीत उपोषणास सुरूवात केलीय…. याच उपोषणाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि वकील गुणरत्न सदावर्तेंनी भेट दिलीय. बीडीडी चाळीतील पोलिसांना मोफत घरं दिली पाहिजे, तसंच 10 लाखांच्या वरती कन्स्ट्रकशन कॉस्ट यायला नको असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय…. तसंच पोलिसांना घरं देण्यावरुन ठाकरे सरकारची लबाडी सुरु असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय. तुटपूंजा पगार असताना 50 लाखांची घर कशी घेणार… त्यामुळे घरांच्या किमतीवर ठाकरे सरकारनं पुनर्विचार करण्याची मागणी पोलीसांनी केलीय… त्यात आता भाजपनं देखील या मुद्यात उडी घेतल्यानं हा विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे….