Special Report | ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर ! -tv9

| Updated on: May 25, 2022 | 11:41 PM

पोलिसांनी मोर्चा रोखला आणि कार्यकर्त्यांसह भाजपच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवारांसह गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना आझाद मैदानात आणून सोडलं.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी, मुंबईत भाजपनं मोर्चा पुकारला. नरिमन पॉईंटच्या ऑफिसपासून मोर्चाला सुरुवात झाली. मात्र मंत्रालयाजवळ येण्याआधीच पोलिसांनी मोर्चा रोखला आणि कार्यकर्त्यांसह भाजपच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवारांसह गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना आझाद मैदानात आणून सोडलं. त्याआधी मोर्चाच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षणासाठी भाजपनं मोर्चा काढला…तर मुंबईत राष्ट्रवादीचा ओबीसी मेळावा घेतला…एक तर आरक्षण द्या नाही तर मसनात जा, अशी टोकाची टीका चंद्रकात पाटलांनी केली. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातही ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागला होता…सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेशचा प्रश्न निकाली लागला…मात्र दिल्लीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणासोबत बैठक झाली ?, असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रासोबत केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला…

Published on: May 25, 2022 11:40 PM
Special Report | वाद सुरु होताच बीएमसीची नोटीस का धडकते? -tv9
Special Report | विठ्ठल मंदिर हे बौध्द विहार? प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा दाखला – tv9