Special Report | अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर राडा, मिटकरी वादात का असतात?
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली. आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आत येण्यास अडवले. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. धक्काबुक्की आम्हालाच नाही, तर आम्हीही धक्काबुक्की केली, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. आम्ही त्यांच्या घरात घुसलो आणि यापुढेही त्यांच्या घरात घुसू, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवारांनी पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.