Special Report | मानापमान नाट्याचे तिसऱ्या दिवशीही पडसाद-tv9

| Updated on: Jun 17, 2022 | 9:17 PM

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्याला ३ दिवस झाले...तरी त्यावरुन उठलेलं राजकीय वादळ अद्याप शांत झालेलं नाही..देहू दौऱ्यात अजितदादांना भाषणाची संधी नाकारल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली..भाजपनंही त्याला प्रत्युत्तर दिलं...

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्याला ३ दिवस झाले…तरी त्यावरुन उठलेलं राजकीय वादळ अद्याप शांत झालेलं नाही..देहू दौऱ्यात अजितदादांना भाषणाची संधी नाकारल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली..भाजपनंही त्याला प्रत्युत्तर दिलं…पण काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मिनिट टू मिनिट प्रोग्रॅमच व्हायरल केला..या प्रोग्रॅममध्ये अजित पवार यांचं नाव आधीपासूनच नव्हतं असा दावा मिटकरींनी केलाय..त्याला भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीही उत्तर दिलंय..देहूतल्या शिळा मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं..त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं..आणि फडणवीसांच्या भाषणानंतर आयोजकांनी थेट मोदींनाच भाषण करण्याची विनंती केली..पण याचं खुद्द मोदींनाही आश्चर्य वाटलं..मोदींनी अजित पवारांचं भाषण का नाही अशी विचारणाही केली..पण अजितदादांनी मोदींना तुम्हीच भाषण करा असा आग्रह केला..

 

Published on: Jun 17, 2022 09:17 PM
Protest On BJP Office | भाजप कार्यालयाबाहेर तृतीयपंथीयांचे आंदोलन – tv9
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड एका कॅमेरामनसाठी ठरले देवदूत! भोवळ येऊन बेशुद्ध पडल्यावर कराडांनी दिले प्रथमोपचार