Special Report | शरद पवारांनी केलेल्या कौतुकाचं कोडं देवेंद्र फडणवीसांनाच उमगलं?
पवारांकडून बोध घ्या, असा सल्ला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय. दुसरीकडे काही काँग्रेस नेते फडणवीसांच्या कौतुकावरुन पवारांना टोला मारत आहेत. विजया नंतर शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्हीही फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केल्यामुळे भाजप नेते त्यावरुन मविआला डिवचू लागले आहेत. पवारांकडून बोध घ्या, असा सल्ला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय. दुसरीकडे काही काँग्रेस नेते फडणवीसांच्या कौतुकावरुन पवारांना टोला मारत आहेत. विजया नंतर शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्हीही फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पण कोल्हापुरमध्ये आम्ही जिंकलो तेव्हाही आम्हाला मित्रांकडून अशीच शुभेच्छांची अपेक्षा होती. काल पवारांच्या कौतुकानंतर शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनीही फडणीसांची खेळी यशस्वी झाल्याचं म्हटलं. चंद्रकांत पाटलांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली.
पण पवारांच्या कौतुकात एक खोच होती. फडणवीस हे विविध मार्गांनी माणसं आपलीशी करतात, असा शब्द पवारांनी वापरला. ते बोलताना त्यांनी विविध या शब्दावर जोर दिला. त्या वाक्यातली मेख फडणवीसांनी बरोब्बर हेरली. म्हणून इतर भाजप नेत्यांनी पवारांच्या कौतुकाचं समर्थन केलं. मात्र फडणवीसांनी पवारांच्या कौतुकात जो एक टोमणा होता. त्याला टोमण्यानंच उत्तर दिलं.