Special Report | 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार-tv9
राज्यसभा निवडणुकीत उधळलेला गुलाल अजून खालीही बसलेला नाही..तोवरच भाजपनं लोकसभा निवड़णुकीसाठी कंबर कसलीय़..२०२४ च्या लोकसभेची तयारी भाजपनं आत्तापासूनच सुरु केलीय..भाजपचं पहिलं लक्ष आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर बारामतीच्या खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे.
राज्यसभा निवडणुकीत उधळलेला गुलाल अजून खालीही बसलेला नाही..तोवरच भाजपनं लोकसभा निवड़णुकीसाठी कंबर कसलीय़..२०२४ च्या लोकसभेची तयारी भाजपनं आत्तापासूनच सुरु केलीय..भाजपचं पहिलं लक्ष आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर बारामतीच्या खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे…बारामतीत राष्ट्रवादीची ताकद आहे..२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांचन कुल यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला होता..भाजपच्या टार्गेटवर दुसरा मतदारसंघ आहे शिरुर. शिरुरचे सध्याचे खासदार आहेत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे. शिरुरमध्ये शिवसेनेचीही मोठी ताकद आहे.. २०१९ च्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघावरही भाजपची नजर आहे. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे खासदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव केला होता.