Special Report | राष्ट्रवादीचं मिशन मुख्यमंत्रिपद आहे का ? -tv9
पुढचा मुख्यमंत्री आपलाच, म्हणजे राष्ट्रवादीचाच असेल असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. विशेष म्हणजे काही दिवसांआधीच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानी समोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून नवस केलाय.
पुढचा मुख्यमंत्री आपलाच, म्हणजे राष्ट्रवादीचाच असेल असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. विशेष म्हणजे काही दिवसांआधीच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानी समोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून नवस केलाय. विधानसभेच्या निकालानंतर भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, महाविकास आघाडी स्थापन झाली. तेव्हाच उद्धव ठाकरे 5 वर्षे मुख्यमंत्री राहतील हे घोषितही झालं. पण आता महाविकास आघाडीच्याच माध्यमातून पुढचा मुख्यमंत्री आमचा असा दावा राष्ट्रवादीकडून सुरु झालाय. तर आशा ठेवण्यात गैर काही नाही, कोणाला दिवसाही स्वप्न पडतात असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय. अर्थात महाविकास आघाडीची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडी राहिली की नाही माहिती नाही..त्यातही ज्या पक्षाचे अधिक आमदार, तोच पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करेल. त्यामुळं आधी सर्वाधिक आमदार कसे निवडून येतील हे आव्हान त्या त्या पक्षासमोर असेल.