Special Report | राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट, महाविकास आघाडीत ताटातूट?
राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेना काही अपक्षांबरोबरच काँग्रेसवरही नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेच्या या संभाव्य भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, राज्यसभेत जसं मतांच्या गणितांचा पेच शिवसेनेपुढे होता., तसाच पेच विधानपरिषदेत काँग्रेसपुढे असणार आहे.
विधानपरिषदेसाठी ज्या अपक्षांची पुन्हा 10 दिवसांनी गरज लागणार आहे, त्यापैकी काही अपक्षांवर राऊतांनी इतका हल्लाबोल का केला असेल? यामागचं कारण सांगितलं जात आहे की, यापुढे तुम्ही तुमचं बघा आणि आम्ही आमचं बघतो हे शिवसेनेचं सूत्र आहे. म्हणजे राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेना काही अपक्षांबरोबरच काँग्रेसवरही नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेच्या या संभाव्य भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, राज्यसभेत जसं मतांच्या गणितांचा पेच शिवसेनेपुढे होता., तसाच पेच विधानपरिषदेत काँग्रेसपुढे असणार आहे.
येत्या 20 तारखेला विधानपरिषदेच्या 10 जागांवर निवडणूक आहे. या 10 जागांमध्ये शिवसेनेनं वाट्याला येणाऱ्या 2 जागांवर त्यांनी सचिन अहिर आणि आमशा पाडवींना उमेदवार दिलीय. शिवसेनेकडच्या संख्याबळानुसार या दोघांचा विजय सोपा आहे. राष्ट्रवादीनं त्यांच्या रिक्त 2 जागांवर एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकरांना उमेदवारी दिलीय, या दोघांचाही विजय निश्चित आहे. भाजपनं प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे 5 उमेदवार दिले आहेत. भाजपच्या संख्याबळानुसार या 5 पैकी 4 जणांचा विजय सोपा आहे आता उरतो प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेसच्या संख्याबळानुसार त्यांची एक जागा सहज येऊ शकते. मात्र काँग्रेसनं इथं दोन उमेदवार दिले आहेत. पहिले म्हणजे भाई जगताप आणि दुसरे चंद्रकांत हंडोरे आणि याच दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला अपक्षांची गरज लागणार आहे.