Special Report | अयोध्या स्थगितीनंतर मनसेचा मराठी ‘राग’? -tv9
मनसे नेते आता पुन्हा हिंदुत्वावरुन मराठीच्या मुद्द्याला जोर देऊ लागल्याचं दिसतंय. जोपर्यंत अयोध्या दौऱ्या स्थगित झालेला नव्हता, तोपर्यंत मनसे नेत्यांनी बृजभूषण सिंहांबाबत सावध प्रतिक्रिया दिल्या.
मनसे नेते आता पुन्हा हिंदुत्वावरुन मराठीच्या मुद्द्याला जोर देऊ लागल्याचं दिसतंय. जोपर्यंत अयोध्या दौऱ्या स्थगित झालेला नव्हता, तोपर्यंत मनसे नेत्यांनी बृजभूषण सिंहांबाबत
सावध प्रतिक्रिया दिल्या. मात्र जेव्हा खुद्द राज ठाकरेंनीच दौरा स्थगित केल्याचं जाहीर करताच,
मनसे नेत्यांच्या तोंडीही आता धमकीवजा इशाऱ्याची भाषा आलीय आणि बृजभूषण सिंहांना इशारा देताना पुन्हा मराठी बाण्याचा दाखला दिला जातोय. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज पहिल्यांदाच मनसेच्या आरोपांवर उत्तर दिलंय. बृजभूषण सिंहांमागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी मनसे आणि राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केलीय. ठाण्यातल्या याआधीच्या सभेत मराठी माणूस हिंदू कधी होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र प्रकाश महाजन आता बाबरी पाडण्यावरुन पुन्हा मराठी आणि महाराष्ट्राच्या माणसाचा दाखल देत बृजभूषण सिंहावर टीका करतायत.