Special Report | अटकेच्या भीतीनं Ganesh Naik नॉटरिचेबल?-tv9

| Updated on: Apr 19, 2022 | 9:29 PM

भाजपचे आमदार गणेश नाईकांवरच्या या आरोपांमुळं, महिला आयोगानं थेट अटकेचे निर्देश दिलेत. नाईकांसोबतच्या संबंधातून मुलगा झाला असून त्याला वडिलांचं नाव मिळावं अशी मागणी तक्रारदार महिलेची आहे.

भाजपचे आमदार गणेश नाईकांवरच्या या आरोपांमुळं, महिला आयोगानं थेट अटकेचे निर्देश दिलेत. नाईकांसोबतच्या संबंधातून मुलगा झाला असून त्याला वडिलांचं नाव मिळावं अशी मागणी तक्रारदार महिलेची आहे. आता नाईकांविरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी आंदोलनही केलं. नाईकांना अटक करण्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. महिलेनं एका तक्रारीत, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं होतं आणि आता जबरदस्तीनं शारिरीक संबंध ठेवल्याचंही महिला म्हणतेय. गणेश नाईकांपासून झालेला मुलगा आता 15 वर्षांचा असून त्याला वडील म्हणून गणेश नाईकांचं नाव मिळावं, अशी मागणी महिलेची आहे..मात्र धमकी देण्याबरोबरच मुलालाही त्यांच्या घरी गेल्यावर हाकलून देतात, असा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.

Video : आताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…
Special Report | आमदार यादीतून Eknath Khadse, Urmila Matondkar आणि Sachin Sawant यांचा पत्ता कट?-tv9