Special Report | मंदिर तोडूनही गाभा शाबूत का राहिला ? पाहा रिपोर्टमध्ये काय आलं? -tv9
दाव्याप्रमाणे तलावात शिवलिंगाचा तर वाद आहेच. मात्र दुसरा यात कडीचा मुद्दा आहे, तो म्हणजे ज्ञानवापी मशिदीतल्या भिंती आणि तळघरातल्या खोल्यांचा. काशी विश्वनाथच्या परिसरात असलेला नंदी आणि तलावाचं अंतर जवळपास 83 फूट आहे आणि जी ज्ञानवापी मशीद आहे, तिला चारही बाजूंनी बॅरिकेटिंग केलं गेलंय.
दाव्याप्रमाणे तलावात शिवलिंगाचा तर वाद आहेच. मात्र दुसरा यात कडीचा मुद्दा आहे, तो म्हणजे ज्ञानवापी मशिदीतल्या भिंती आणि तळघरातल्या खोल्यांचा. काशी विश्वनाथच्या परिसरात असलेला नंदी आणि तलावाचं अंतर जवळपास 83 फूट आहे आणि जी ज्ञानवापी मशीद आहे, तिला चारही बाजूंनी बॅरिकेटिंग केलं गेलंय. त्या बॅरिकेटिंगच्या आतमध्ये चारही बाजूंनी एक भिंत आहे आणि या भितींवरुनही अनेक दावे-प्रतिदावे आहेत. हिंदू पक्षकारांच्या मते मंदिराच्या लागून असलेल्या या भिंतीत एक तळघर आहे. म्हणजे त्या तळघरात जाण्याचा रस्ता याच भिंतीच्या आड आहे. जर ते तळघर उघडलं गेलं, तर त्यात अनेक हिंदू प्रतिकृतींचे पुरावे मिळतील. दुसरा दावा आहे तो म्हणजे मशिदीच्या डाव्याहाताकडच्या दरवाज्यांवरुन. डाव्या बाजूला एकूण 4 दारं आहेत. त्यापैकी एक दार खूप आधीपासून सुरुय….याच दारातून मुस्लिम लोक मशिदीत नमाज पडण्यासाठी येतात. मात्र त्याला लागून असलेले हे ३ दरवाजे बंद आहेत.. या दरवाजांच्या आतल्या भागातही तळघर आहे…जिथं अनेक मूर्ती असण्याचा दावा केला जातोय. हे तिन्ही दारं उघडली जावीत, यासाठी सुद्धा कोर्टात युक्तिवाद केला जातोय….