Special Report | 15 दिवसांत अनधिकृत बांधकामावर हातोडा?-TV9
ज्या घरातून पोलिसांनाच बाहेर जाण्याचा इशारा नवनीत राणा पोलिसांना देत होत्या...त्याच घरावर कारवाई करण्याची तयारीत मुंबई महापालिका आहे. पुढील 7 ते 15 दिवसांत घरातील अनधिकृत बांधकाम एकतर तुम्ही पाडा, नाही तर आम्हीच बांधकाम पाडू असं पत्र राणा दाम्पत्यांना मुंबई महापालिकेनं पाठवलंय.
ज्या घरातून पोलिसांनाच बाहेर जाण्याचा इशारा नवनीत राणा पोलिसांना देत होत्या…त्याच घरावर कारवाई करण्याची तयारीत मुंबई महापालिका आहे. पुढील 7 ते 15 दिवसांत घरातील अनधिकृत बांधकाम एकतर तुम्ही पाडा, नाही तर आम्हीच बांधकाम पाडू असं पत्र राणा दाम्पत्यांना मुंबई महापालिकेनं पाठवलंय. मुंबईतल्या खारमधल्या लाव्ही नावाच्या याच इमारतीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांचा फ्लॅट आहे. मात्र या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.. ज्यात बेकादेशीर बांधकाम आढळल्यानंतर, राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली. पण राणा दाम्पत्याचं उत्तर असमाधानकारक असल्यानं आता बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालणार आहे.
8 व्या माळ्यावर राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. 2016मध्ये राणांनी 2500 चौरस फुटांचा 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. युसूफ लकडावाला आणि नागराज या दोन्ही बिल्डरचा हा प्रोजेक्ट आहे. हे तेच लकडावाडा आहेत, ज्यांच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप गेल्याच महिन्यात संजय राऊतांनी नवनीत राणांवर केला होता. लकडावालाचा 2021 मध्ये कोठडीतच मृत्यू झालाय..आणि दाऊदच्या डी कंपनीचा तो फायनान्सर होता. लिफ्टजवळची मोकळी जागा फ्लॅटमध्ये घेऊन तिथे टॉयलेट बांधलं. लॉबीचा वापर घरगुती वापरासाठी सुरु आहे. मोकळ्या उताराच्या जागेचं रुपांतर बाल्कनीत केलं. हॉलचे 2 भाग करत एक भाग हॉलशी आणि दुसरा बेडरुमशी जोडला. बाल्कनी बेडरुम आणि किचनशी जोडली.
मात्र फ्लॅटमध्ये आम्ही कोणतंही बेकायदेशीर बांधकाम केलंच नसल्याचं राणांचं म्हणणंय. बिल्डरला NOC मुंबई महापालिकेनंच दिली. आणि त्याच बिल्डरकडून आम्ही फ्लॅट विकत घेतला. म्हणजे ग्राहक म्हणून आमची फसवणूक तर मुंबई महापालिकेनंच केली असा आरोप राणांचा आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांची घरं मुंबई महापालिकेच्या रडारवर आलीत. आधी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहूतल्या बंगल्यातही बेकायदेशीर बांधकाम असल्याची नोटीस राणेंना आली. भाजप नेते मोहीत कंबोज यांनाही नोटीस आलीय…
2020 मध्ये तर अभिनेत्री कंगना रनौतच्याच मुंबईतल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं बुल्डोझरनं कारवाई केली होती..महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात बांधकाम तोडलं होतं. मात्र त्यानंतर खुद्द हायकोर्टानंच तोडकामाची कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. आता बांधकाम तोडण्याचं पत्र राणांना आलंय…त्यामुळं 15 दिवसांत स्वत: राणा अनधिकृत बांधकाम तोडतात की, मग महापालिकेचा हातोडा चालणार, हे दिसेलच.