Special Report | हनुमान चालीसाचं आव्हान, नवनीत राणांचा भडका!-TV9
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिस म्हणणारच, असं आव्हान देण्यावरुनच राणा दाम्पत्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली...राजद्रोहाचं कलमामुळं 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याच्या जेलमधून सुटका झाली.. मात्र तुम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे का ?, यावरुन फोन कॉल करुन काही जण आव्हान देतायत.
नवनीत राणा आणि रवी राणांची कथित ऑडिओ क्लीप सध्या जोरात व्हायरल झालीय…
यात तारीफ कादरी नावाचा तरुण, कॉल करुन नवनीत राणांना हनुमान चालीसा म्हणण्याचं सारखं आव्हान देतोय…त्यानंतर नवनीत राणा एवढ्या संतापल्या की थेट त्या तरुणाला कानाखाली लगावण्याचाच इशारा दिला.. नवनीत राणांनंतर हा तरुण रवी राणांशीही बोलतोय…आणि रवी राणांनाही हनुमान चालीसा म्हणून दाखवा, असं आव्हान वारंवार देतो…गेल्या 2 महिन्यांपासून हनुमान चालीसावरुनच राणा दाम्पत्य चर्चेत आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिस म्हणणारच, असं आव्हान देण्यावरुनच राणा दाम्पत्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली…राजद्रोहाचं कलमामुळं 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याच्या जेलमधून सुटका झाली.. मात्र तुम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे का ?, यावरुन फोन कॉल करुन काही जण आव्हान देतायत..काही दिवसांआधी एका इंग्रजी चॅनलच्या पत्रकारच्या प्रश्नावरही नवनीत राणा उत्तर देऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळं हनुमानजींचं नाव कसं पडलं हा प्रश्न असो की, हनुमान चालीसा पाठ आहे का ?…यावरुन राणा दाम्पत्याची घेरणं थांबताना दिसत नाहीय…