Special Report | शिवसैनिकांच्या हल्ल्याची राज्यपालांकडे तक्रार!-TV9

| Updated on: Apr 27, 2022 | 8:50 PM

आधी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार. नंतर खार पोलिसात धाव पण तक्रारच घेतली नाही. आणि आता राज्यपालांची भेट. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर जो FIR पोलिसांनी नोंदवला..त्या विरोधात सोमय्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आणि थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेवरच कारवाईची मागणी केली.

आधी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार. नंतर खार पोलिसात धाव पण तक्रारच घेतली नाही. आणि आता राज्यपालांची भेट. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर जो FIR पोलिसांनी नोंदवला..त्या विरोधात सोमय्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आणि थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेवरच कारवाईची मागणी केली. हल्ल्यानंतर पोलिसांनी खोटी FIR केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. शनिवारी सोमय्यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनच्या परिसरातच शिवसैनिकांनी हल्ला केला. मात्र जीवे मारण्याचा प्रयत्न झाला ते कलम का लावलं नाही ? , असा प्रश्न सोमय्यांचा मुंबई पोलिसांना आहे आणि आता तर त्यांनी हायकोर्टात जाण्याचीही तयारी केलीय. त्यातच आता सोमय्यांची ती जखम पुन्हा एकदा चर्चेत आलीय. गाडीवर हल्ला झाल्यानंतर सोमय्यांच्या हनुवटीवर जखम झाल्याचं दिसत होतं..मात्र आता भाभा रुग्णालयानं दिलेल्या अहवालानुसार, सोमय्यांना झालेली जखम 0.1 सेंटीमीटरची होती गंभीर जखम नसून रक्तस्राव झाला नाही, असं अहवालात म्हटलंय.जखम पाहू नका तर ज्या प्रकारे जीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यानुसार कलमं लावा, अशी मागणी भाजपची आहे. मात्र मुंबई पोलिसांनी आधीच्या FIR विरोधात तक्रार घेण्यास सोमय्यांना नकार दिलाय. त्यामुळंच प्रकरण राज्यपालांच्या दरबारात पोहोचलंय.

Special Report | ठाकरेंनी थेट हिशबच मांडला, केंद्राचेच कर अधिक!-TV9
Sharad Pawar Iftar Party Speech : इफ्तार पार्टीत शरद पवार यांचा Raj Thackeray यांना टोला