Special Report | मुंबईतल्या Shivsena भवनाबाहेर मनसेचा ‘भोगा’-tv9

| Updated on: Apr 10, 2022 | 9:17 PM

मनसेच्या मशिदीवरच्या भोंग्याविरोधातलं आंदोलन आता शिवसेना विरुद्ध मनसे संघर्षात रुपांतरीत होऊ लागलंय. आज मनसेनं शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसा लावली. मनसेचं आंदोलन सुरु होताच, पोलीस घटनास्थळी आले. आणि त्यांनी लाऊड स्पीकरसहीत मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

मनसेच्या मशिदीवरच्या भोंग्याविरोधातलं आंदोलन आता शिवसेना विरुद्ध मनसे संघर्षात रुपांतरीत होऊ लागलंय. आज मनसेनं शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसा लावली. मनसेचं आंदोलन सुरु होताच, पोलीस घटनास्थळी आले. आणि त्यांनी लाऊड स्पीकरसहीत मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. मनसेच्या भोंग्याच्या आंदोलनात शिवसेना एका बाजूला आहे. आणि दुसरीकडे भाजप मनसेच्या सुरात सूर मिसळू पाहतेय. मनसे पक्ष संपला कि नाही जनता ठरवेल पण सेनेचे हिंदुत्व संपलं आहे, आम्ही सेना भवनसमोर हनुमान चालीसा म्हणून याना राग का येतो, आदित्य ठाकरेने आमच्या पक्षाबाबत बोलू नये, शिवसेना हि मुस्लिम लीग सेना झालं का, शिवसेना हिंदू म्हणते मग हनुमान चालीसा आम्हाला का लावू देत नाही , असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Special Report | Raosaheb Danve यांच्याकडे भाजप-मनसेच्या ‘रेल्वे’जोडणीचं काम?-tv9
Special Report | भारतातील काही राज्य श्रीलंकेच्या वाटेवर ?