Special Report | ‘उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात’, नारायण राणेंचा दावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

| Updated on: Jun 12, 2022 | 11:33 PM

राज्यसभेत शिवसेनेची 1 जागा पडल्यामुळे राणेंनी ठाकरे सरकार थेट अल्पमतात आल्याचा दावा केलाय. अपक्षच नाही तर मविआतले काही आमदार सुद्धा फुटल्याचे संकेत राणेंच्या विधानातून मिळतायत. मात्र, इकडे राऊत आणि पवार मविआची मतं फुटली नाहीत, यावर ठाम आहेत.

राज्यसभेत शिवसेनेची 1 जागा पडल्यामुळे राणेंनी ठाकरे सरकार थेट अल्पमतात आल्याचा दावा केलाय. अपक्षच नाही तर मविआतले काही आमदार सुद्धा फुटल्याचे संकेत राणेंच्या विधानातून मिळतायत. मात्र, इकडे राऊत आणि पवार मविआची मतं फुटली नाहीत, यावर ठाम आहेत. संजय राऊतांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे या तिघांची मतं फुटल्याचा आरोप केला होता, त्यापैकी देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे हे दोन्ही आमदार अजित पवाारांचे जवळचे मानले जातात.

त्यामुळे काल मविआतून बाहेर पडलेल्या राजू शेट्टींनी फेसबूकवरुन हे मत कसं फुटल याचा रोख पवारांकडे वळवला होता. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानीच्या तिकीटावर जिंकले आहेत, मात्र नंतर त्यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी केल्याचा दावा राजू शेट्टींचा आहे. याआधी राणेंनी सरकार पडण्याच्या अनेक तारखा दिल्या होत्या. आज पुन्हा पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राणेंनी ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला. त्यामुळे 20 जूननंतर सरकार पडू शकतं का, हा प्रश्नही राणेंना विचारण्यात आला, त्या प्रश्नांवर मात्र राणेंनी वेगळं उत्तर दिलं.

Published on: Jun 12, 2022 11:33 PM
Special Report | राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट, महाविकास आघाडीत ताटातूट?
Special Report | शरद पवारांनी केलेल्या कौतुकाचं कोडं देवेंद्र फडणवीसांनाच उमगलं?