Special Report | हनुमान चालिसासाठी आलेल्या राणांमागे ‘साडेसाती’?-tv9
जेव्हा मुंबई पोलीस अटक करायला आले, तेव्हा राणा दाम्पत्य पोलिसांनाच आव्हान देत होतं. मात्र आता कोर्टाच्या तंबीनंतर माध्यमांशी एकही शब्द न बोलता राणा दाम्पत्य तुरुंगाबाहेर पडलं.
जेव्हा मुंबई पोलीस अटक करायला आले, तेव्हा राणा दाम्पत्य पोलिसांनाच आव्हान देत होतं. मात्र आता कोर्टाच्या तंबीनंतर माध्यमांशी एकही शब्द न बोलता राणा दाम्पत्य तुरुंगाबाहेर पडलं. त्यात मानेचा त्रास बळावल्यामुळे नवनीत राणा तुरुंगातून थेट दवाखान्यात गेल्यात. अटकेआधी आणि अटकेनंतरची ही दृश्यं सेम टू सेम सदावर्तेंच्या प्रकरणातही पाहायला मिळाली. अटकेआधी कस्टडीत हत्या होण्याची भीती सदावर्ते वर्तवत होते. मात्र 18 दिवस तुरुंगात काढल्यानंतर सदावर्तेंनी कस्टडीत मिळालेल्या वागणुकीचं भरभरुन कौतुक केलं. राजद्रोहासह कायदा सुव्यवस्था हातात घेणं, चिथावणी देणं आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणं असे गुन्हे राणा दाम्पत्यावर दाखल आहेत. त्यावर ११ दिवसांनी त्यांना सशर्त जामीन मिळाला. मात्र जामिनाची एकही अट तोडली, तर पुन्हा राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.