Special Report | भाजपच्या ‘शर्यती’त राष्ट्रवादीचा आमदार ‘सरस’- tv9

| Updated on: Jun 02, 2022 | 11:41 PM

इकडे रोहित पवारांनी भरवलेली शर्यत ही एकूण २२ लाख रुपयांच्या बक्षीसांची आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनं भरवलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत बक्षीसांची लयलूट मात्र राष्ट्रवादीनं केली.

राज्यात सध्या बैलगाडांचा शर्यतींचा थरार सुरुय. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीतून साधलं
जाणारं राजकारण महत्वाचं आहे….बैलगाड्यांच्या शर्यीतबरोबर कोणता नेता किती मोठ-मोठ्या इनामांची स्पर्धा भरवतो, याचीही शर्यत लागते…याआधी भाजपच्या महेश लांडगेंनी बैलगाडा स्पर्धा भरवली… आणि त्यानंतर कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी. भाजपच्या महेश लांडगेंनी भरवलेली बैलगाडा शर्यत देशातली सर्वात मोठी शर्यत ठरली…ज्यात तब्बल दीड कोटींची बक्षीसं होती. पहिलं बक्षीस होतं जेसीबी….दुसरं होतं बोलेरो गाडी. तिसरं होतं ट्रॅक्टर, चौथं होतं दोन बुलेट आणि नंतरच्या बक्षीसांमध्ये तब्बल 114 मोटरसायकली होत्या.  इकडे रोहित पवारांनी भरवलेली शर्यत ही एकूण २२ लाख रुपयांच्या बक्षीसांची आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनं भरवलेल्या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत बक्षीसांची लयलूट मात्र राष्ट्रवादीनं केली.

म्हणजे स्पर्धा भरवली भाजपनं, मात्र ज्या बैलगाडीनं पहिलं बक्षीस म्हणजे जेसीबी मशीन जिंकलं, त्या बैलगाडीचे मालक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रामनाथ वारिंगे आहेत आणि ज्या बैलगाडीनं दुसरं बक्षीस म्हणजे बोलेरो गाडी जिंकली., ती बैलगाडी राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळकेंची आहे. त्यामुळे भाजपच्या स्पर्धेत राष्ट्रवादी जिंकल्याचा दावा करत काही व्हिडीओ व्हायरल होतायत. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंना खांद्यावर उचलत बैलगाडा घाटातच समर्थकांनी मिरवणूक काढली…

त्यांची जंगी मिरवणूक काल काढली. भाजपच्या घाटात हा राष्ट्रवादीचा जलवा असला, तरी राजकारणापालिकडे जाऊन मी त्याकडे पाहतो, अशी संयमी आणि बैलगाडा मालकाला शोभणारी राजकारणविरहित प्रतिक्रिया आ. शेळकेंनी या बक्षीसावर सरकारनामाशी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या अस्मितेच्या प्रश्न असल्याने बैलांच्या या खेळात सहभागी झालो, असेही ते म्हणाले. इतकी वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती… मात्र बंदी हटल्यानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत मोठा उत्साह आहे… पिंपरी-चिंचवडमधल्या स्पर्धेत एकूण १२०० बैलगाडे धावले…..बैलगाडा शर्यतीतून धावण्यात तरबेज असणारी बैलांची खिल्लारी जात जोपासणं हा हेतू तर आहेच…पण शर्यतीला अर्थकारण आणि राजकारणाचीही मोठी जोड आहे.

 

Published on: Jun 02, 2022 11:41 PM
Special Report | यूपीचा प्रत्येक मुख्यमंत्री नावं का बदलत सुटतो? -tv9
Special Report | मशिदीवरील भोंग्यांवरुन Raj Thackeray पुन्हा आक्रमक -tv9