Special Report | माफी नाही, तर यूपी नाही ? बृजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंना पुन्हा आव्हान -tv9

| Updated on: May 22, 2022 | 10:22 PM

जवळपास 10 दिवसांपासून एक खासदार राज ठाकरेंना आव्हान देत होता. राज ठाकरेंनी त्यावर आज उत्तर दिलं, मात्र त्या उत्तरात एक प्रश्न होता, आणि एक इशारा. प्रश्नावेळी संदर्भ होता तो म्हणजे गुजरातमधले सध्या भाजपात असलेले अल्पेश ठाकूर यांचा आणि इशारा होता, तो म्हणजे जर-तरची भाषा कराल, तर तो पायंडा पडण्याचा.

जवळपास 10 दिवसांपासून एक खासदार राज ठाकरेंना आव्हान देत होता. राज ठाकरेंनी त्यावर आज उत्तर दिलं, मात्र त्या उत्तरात एक प्रश्न होता, आणि एक इशारा. प्रश्नावेळी संदर्भ होता तो म्हणजे गुजरातमधले सध्या भाजपात असलेले अल्पेश ठाकूर यांचा आणि इशारा होता, तो म्हणजे जर-तरची भाषा कराल, तर तो पायंडा पडण्याचा. राज ठाकरेंनी एकतर माफी मागावी, किंवा यापुढे उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेणार नाही., हे जाहीर करावं, असे दोन पर्याय बृजभूषण सिंहांनी राज ठाकरेंना दिले होते. त्यावर हो किंवा नाही मध्ये राज ठाकरेंनी उत्तर दिलं नाही. शिवाय जेव्हा इशारे आणि टीकेच्या परतफेडीचा प्रश्न येतो, तेव्हा राज ठाकरे शेरास सव्वाशेर उत्तर देतात. आज त्याच टीकांची राज ठाकरे व्याजासकट परतफेड करतील, अशी आशा होती…मात्र राज ठाकरेंनी बृजभूषण सिंहांना अनुल्लेखानं मारण्याचा प्रयत्न केला.

Published on: May 22, 2022 10:22 PM
Special Report | राज ठाकरेंना अडकवण्यासाठी सापळा कुठं रचला ? मुंबई, दिल्ली की युपी ? -tv9
Special Report | संभाजी राजे शिवसेनेत प्रवेश करणार? हाती शिवबंधन बांधणार? सस्पेन्स वाढला -tv9