Special Report : शरद पवार यांची गुगली होती, पण विकेट कोणाची? देवेंद्र फडणवीस की अजित पवारांची?

| Updated on: Jun 30, 2023 | 9:40 AM

दोन वर्षानंतरही महाराष्ट्राच्या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट होत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे झाले.

मुंबई : दोन वर्षानंतरही महाराष्ट्राच्या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट होत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे झाले.पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर ऐनवेळी माघार घेत आमच्यासोबत डबलगेम केला, असं फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं पहिल्यांदाच जाहिर केलं. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 30, 2023 09:39 AM
“माझ्या गुगलीवर फडणवीस यांची विकेट”, शरद पवार यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “अजित पवार…”
“उभा राहाच, तुम्हाला पाडून दाखवतो”, रामराजे निंबाळकर यांचं ‘या’ नेत्याला आव्हान…