राज-उद्धव एकत्र येणार? नितीन गडकरी यांनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ इच्छा; पाहा स्पेशल रिपोर्ट…
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु असताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु असताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता भाजप नेते नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा, असं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितले होते. मी तसे प्रयत्न ही केले पण यश आले नसल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. झी मराठीवरच्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे ही इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे, तसे बॅनर्स उद्धव ठाकरे यांच्या सभेतही झळकले. त्यामुळे आता बाळासाहेबांची इच्छा पुर्ण होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान गडकरी यांचा हा दावा उद्धव ठाकरे यांनी मात्र फेटाळून लावलाय. यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…