संदीपान भुमरे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Jun 23, 2023 | 8:07 AM

शिनसेनेचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्याचा आरोप होत आहे. यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलाबद्दल अपशब्द काढल्यामुळे संदीपान भुमरेंकडून शिवीगाळ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

औरंगाबाद : शिनसेनेचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्याचा आरोप होत आहे. यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुलाबद्दल अपशब्द काढल्यामुळे संदीपान भुमरेंकडून शिवीगाळ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दुसरीकडे हा आवाज आपला नसल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला आहे. ज्या तरुणाला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याचं नाव बाबासाहेब वाघ असं आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची भेट घेतली.शिव्या देणारा मंत्री नक्की संदीपान भुमरे आहेत की त्यांच्या आवाजात दुसरा कोणी बोलतोय याच्या चौकशीची मागणी होतेय. दरम्यान नेमकं प्रकरण काय? आणि ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ कोणत्या कारणातून झाली यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: Jun 23, 2023 08:07 AM
छगन भुजबळ यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा; म्हणाले, “मला जबाबदारी दिली तर…”
Special Report : वंचितची ठाकरे गटासोबत युती तरी संजय राऊत यांना शंका? नेमकं प्रकरण काय?