Special Report | पंकजा मुंडे म्हणतात संधीचं सोनं करणार, पण आमदारकी मिळणार? -tv9
गोपीनाथ गडावरुन मोठं सूचक वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केलंय. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजांच्या नावाची चर्चा आहे.. मात्र आपल्याला काय मिळेल आणि काय नाही, याची चिंता नाही..पण संधीचं सोनं करेल असं पंकजा म्हणाल्यात.
गोपीनाथ गडावरुन मोठं सूचक वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केलंय. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजांच्या नावाची चर्चा आहे.. मात्र आपल्याला काय मिळेल आणि काय नाही, याची चिंता नाही..पण संधीचं सोनं करेल असं पंकजा म्हणाल्यात. 20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक होतेय. त्यासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरु आहे. पण आपल्याला भविष्याची चिंता नाही, असं सांगून पंकजांनी यावेळी गोपीनाथ गडावरुन नेतृत्वाला आव्हान दिलं नाही. तर इकडे पंकजा समर्थकांनी, नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार करण्याची मागणी केलीय. संधीचं सोनं करणार असं पंकजा म्हणतायत..समर्थकांकडून दबाव वाढवण्यास सुरुवातही झालीय…तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना डिवचलंय..2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंच होते, असं रोहित पवार म्हणालेत.