Special Report | भाजप आमदार गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार

| Updated on: Apr 21, 2022 | 11:55 PM

भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 तारखेला होणार आहे.

भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 तारखेला होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राजकीय फायद्यासाठी नाईक यांच्याविरोधात खोटे आरोप आणि खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप गणेश नाईकांचे वकील शिरीष गुप्ते यांच्याकडून करण्यात आलाय. 2 वर्षापूर्वी पक्ष बदलल्यामुळे नाईक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नाईक यांच्या वकिलांनी केलाय.

Special Report | अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर राडा, मिटकरी वादात का असतात?
Video: कोकणात गारांचा पाऊस! आजही तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज