Special Report | Raj Thackeray यांनी शनिवारी मटण खाल्ल्याची पोस्ट खरी की खोटी?-tv9
राज्यात सध्या मटणाच्या पोस्टची खूप चर्चा आहे. राज ठाकरेंनी हनुमानाचा वार म्हणून पुण्यात शनिवारी आरती केली. पण या आरतीनंतर सोशल मीडियातल्या काही पोस्टमध्ये राज ठाकरेंना थेट नास्तिक म्हटलं गेलं. आता नास्तिक का म्हटलं गेलं, तर त्याला कारणीभूत ठरली ही व्हायरल पोस्ट.
राज्यात सध्या मटणाच्या पोस्टची खूप चर्चा आहे. राज ठाकरेंनी हनुमानाचा वार म्हणून पुण्यात शनिवारी आरती केली. पण या आरतीनंतर सोशल मीडियातल्या काही पोस्टमध्ये राज ठाकरेंना थेट नास्तिक म्हटलं गेलं. आता नास्तिक का म्हटलं गेलं, तर त्याला कारणीभूत ठरली ही व्हायरल पोस्ट. या व्हायरल बातमीनुसार औरंगाबादहून पुण्याला जाताना राज ठाकरे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आले. आणि त्याठिकाणी त्यांनी मटणाचा आस्वाद घेतला. कुणी काय खावं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र राज ठाकरेंनी हनुमानाचा वार असलेल्या शनिवारी सुद्धा मटण कसं खाल्लं, असा प्रश्न व्हायरल पोस्टद्वारे काहींकडून करण्यात आला. जेव्हा आम्ही या व्हायरल बातमीची माहिती घेतली, तेव्हा ही बातमी कालची नव्हे, तर काही महिनेआधीच्या औरंगाबाद
दौऱ्यावेळची निघाली.