Special Report | Raj Thackeray यांचे इशारा, Asaduddin Owaisi यांचे राज्यघटनेचे दाखले! -tv9
औरंगाबादमधल्या सभेत अजानवरुन राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर MIM खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. जीभ आमच्याकडेही आहे अशा शब्दात जलील यांनी सूचक इशारा दिलाय. राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्यासाठी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला.
औरंगाबादमधल्या सभेत अजानवरुन राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर MIM खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. जीभ आमच्याकडेही आहे अशा शब्दात जलील यांनी सूचक इशारा दिलाय. राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्यासाठी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. मात्र भोंग्यांवर निर्णय घेणारे राज ठाकरे कोण? असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. MIM चे अध्यक्ष ओवैसी यांनीही राज ठाकरेंना राज्यघटनेतल्या तरतुदींचा दाखला देऊन काही सवाल उपस्थित केलेत. दरम्यान राज ठाकरेंच्या सभा राष्ट्रवादी स्पॉन्सर्ड असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय. सुरुवातीला राज ठाकरेंच्या सभेला पोलीस आयुक्तांचा विरोध असताना नंतर परवानगी कशी मिळाली असा सवाल जलील यांनी केलाय.
Published on: May 02, 2022 09:59 PM