Special Report | 12 April ला Raj Thackeray यांची ‘उत्तरसभा’, B Team च्या आरोपांवर काय बोलणार ?

| Updated on: Apr 07, 2022 | 10:01 PM

ज्याठिकाणी मनसे सभा घेणार आहे, त्याठिकाणासाठी पोलिसांनी नकार दिलाय. पण राज ठाकरेंना टेबलवर उभं राहून भाषण करावं लागलं तरी चालेल, पण सभा नियोजीत ठिकाणीच घेऊ यावर मनसे ठाम आहे. 9 तारखेला राज ठाकरेंची सभा ठाण्यातल्या गडकरी रंगायतन नाटय़गृहाजवळच्या मूस चौकात नियोजीत आहे.

शिवर्तीथावरच्या सभेनंतर ठाण्यात येत्या 12 तारखेला मनसेची सभा होणार आहे. मशिदीवरच्या भोंग्याचा वाद, मविआकडून होणारे बी टीमचे आरोप, या सर्वांवर राज ठाकरे या सभेत उत्तर देणार असल्याची माहिती आहे, गुढीपाडव्यानंतर 9 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार आहे, मात्र ज्याठिकाणी मनसे सभा घेणार आहे, त्याठिकाणासाठी पोलिसांनी नकार दिलाय. पण राज ठाकरेंना टेबलवर उभं राहून भाषण करावं लागलं तरी चालेल, पण सभा नियोजीत ठिकाणीच घेऊ यावर मनसे ठाम आहे. 9 तारखेला राज ठाकरेंची सभा ठाण्यातल्या गडकरी रंगायतन नाटय़गृहाजवळच्या मूस चौकात नियोजीत आहे. याच दिवशी गडकरी रंगायतनमध्ये हिंदी भाषा एकता परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. ज्या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक नेते उपस्थित असतील. त्यामुळे वाहुतकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलिसांनी मनसेला दुसऱ्या जागांच्या पर्यायावर विचार करण्याचं आवाहन केलंय.

Special Report | हायकोर्टाचा आदेश, तरी ST संपावरुन सदावर्तेंमुळं ससपेंस? -Tv9
इम्रान खान यांना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 9 एप्रिलला अविश्वास प्रस्तावावर मतदान